शिबला येथे मोफत रोग निदान शिबिर

आमदार बोदकुरवार आणि किशोर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा शिबला येथे २४ नोव्हेंबर शुक्रवार ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजाकाकडून सांगण्यात येत आहे.

ह्या शिबीरात सर्व रोगनिदानावर उपचार, रक्तदान करण्यात येइल तसेच ह्या शिबिरात आरोग्य योजना, आदिवासी योजना, अन्न सुरक्षा योजना, विज, पाणी, रस्त्याचि दुर्दशा, दारु- मटका, बोंडअळी, वाघ व इतर प्राण्यामुळे शेत्तीचे नुकसान, मुद्रा योजना, पिक कर्ज, व इतर विषयावर मार्गदर्शन व उपाययोजना बद्दल माहिती देण्यात येइल.

मार्गदर्शनाकरीता प्रमुख अतिथी म्हणून किशोर तिवारी, पालकमंत्री मदनभाऊ येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्या संगीता मानकर, मीनाक्षी बोल्लेनवार, पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी दिपक सिंघला, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी देवी ह्या हजर राहुन झरी तालुक्यातील वरील समस्यांवर मार्गदर्शन करतील.

Kishor tiwariLead StoryMLA Sanjivreddi bodkurwarShibla
Comments (0)
Add Comment