विवेक तोटेवार, वणी: दीपक टॉकीज परिसरातून एक दुचाकी चोरट्यास वणी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सदर चोरटा हा राळेगाव तालुक्यातील एक अट्टल दुचाकी चोरटा असून त्याने नागपूर येथून एक दुचाकी चोरली होती.
21 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान अट्टल आरोपी सतीश उर्फ शेंमड्या बाबाराव मडावी (25) रा. राळेगाव हा दीपक टॉकीज परिसरात एका मोपेड (MH 31 DF 1266) गाडीसह दिसून आला. त्याला सदर गाडी बाबत विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच त्याने गाडीची कागदपत्रे दाखवू न शकल्याने कलाम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी अधिक माहिती काढली असता सदर दुचाकी ही नागपूर येथून चोरी गेल्याची तक्रार नागपूर लकडगंज पोलीस ठाण्यात कलम 379 नुसार गुन्हा नोंद असल्याचे समजले. सदर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती देऊन पुढील कारवाई साठी दुचाकी व आरोपीला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांनी केली.