मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन घटना

5 जणांवर गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन वेगवेगळ्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील 5 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

पहिल्या घटनेत फिर्यादी रवी रामराव गाडगे रा.रामपुरा यांचा साळा संतोष दिलीप मेश्राम दीपक चौपाटी जवळील करण बार समोर उभे होता. दरम्यान ईश्वर दशरथ देठे (28) व राम दशरथ देठे (32) दोघे रा. रंगनाथ नगर हे दोघे तिथे पोहोचले व यांनी जुन्या कारणावरून संतोषला लथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत रवी गाडगे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम 324, 504, 506, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला.

दुस-या घटनेत शिवशक्ती बाळाराम चव्हाण, रा. वाटर सप्लाय जवळ यांच्यासोबत गजानन होमदेव कनाके वय अंदाजे (19 वर्ष) यांनी मोटारसायकलला वेल्डिंग मारण्यावरून वाद केला.  गजानने शिवक्तीच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून जखमी केले. याबाबत शिवशक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 324, 504 अनव्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.

तिस-या घटनेत फिर्यादी संकेत गंगाधर पारशिवे, रा. भोईपुरा यांनी गैरअर्जदार अभिषेक (21) व अंकुश (20) यांच्या विरुद्ध मारहाण, अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीवरून गैरअर्जदार विरुद्द कलम 294, 323, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

FightLead StoryMarhan
Comments (0)
Add Comment