जैताई नवरात्रोत्सव: आरती पुस्तकचे विमोचन

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टो. रोजी जैताई देवस्थानात जैताईच्या आरती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच जैताई मंदिर विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचाही जैताई मंदिर समितीतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

आज सायंकाळी आरती नंतर जैताई मंदिर सभागृहात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात राजू उंबरकर व तृप्ती उंबरकर यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व साडी देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जैताई माताच्या आरती पुस्तकचे विमोचनही करण्यात आले.

सत्कार समारंभात प्रो.डॉ. स्वानंद पुंड, बाळासाहेब सरपटवार, नरेंद्र नगरवाला, मुन्ना पोतदार, किशोर साठे, राजा जयस्वाल, दिवाण फेरवानी, मयूर गोयनका, नामदेव पारखी, श्रीबल्लभ सरमोकदम, प्रशांत महाजन उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Jaitai mandir
Comments (0)
Add Comment