वणीत राज ठाकरेंचे जंगी स्वागत, दु. 12 वा. शिवतिर्थावर अभिवादन

अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसोबत लुटला क्रिकेट, फूटबॉलचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: गुरवारी रात्री राज ठाकरे यांचे वणीत आगमन झाले. यावेळी त्यांचे मनसे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. आज शुक्रवारी सकाळी ते हॉटेल जन्नत येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मनसे पदाधिका-यांशी विधानसभेच्या अनुशंगाने बैठक घेणार आहेत. शिवाय ते पक्ष संघटन यावर पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 वाजता ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. अभिवादन नंतर राज ठाकरे यांचे भव्य स्वागत समारंभ आयोजित केला जाणार आहे. यावेळी ते वणीकरांशी संवाद साधणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहराच्या प्रमुख चौकात होर्डिंग्ज, ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आले होते. रात्री राज ठाकरे यांचे वणीत आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. दरम्यान राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसोबत फूटबॉलचा आनंद लुटला.

 

Lead StoryMns