चंद्रपूरला जाणा-या ट्रकला करणवाडीजवळ अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: करणवाडीजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट डिव्हायडरवर चढला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिकवरून (MH19 Z1473) हा ट्रक चंद्रपूरच्या दिशेने निघाला होता. या गाडीत क्रेशरचे साहित्य होते. दरम्यान सोमवारी दिनांक 23 च्या मध्यरात्री ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक डिव्हायडरवर चढला. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे आर्थिक नूकसान झाले. 

हे देखील वाचा:

सोशल मीडियावर इमोजीचा पगडा

KaranwadiLead Story
Comments (0)
Add Comment