बोरगाव येथील वत्सलाबाई ताजने यांचे निधन

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रहिवासी श्रीमती वत्सलाबाई आनंदराव ताजने यांचे दि.२३ जुलै सोमवारला यवतमाळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.

झाडगाव येथील शिक्षक सुभाष ताजने यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या मागे मुलगा सुभाष, सून, मुलगी छाया, जावई गुणवंतराव गौरकार, नातू छगन, नात अलिशा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Lead Storyvatsalabai tajne
Comments (0)
Add Comment