चक्क 100 टक्के गुण घेऊन वणीची ‘वैष्णवी’ नोएडात चमकली

वणाीच्या शिरपेचात मानाचा तुरा...

जितेंद्र कोठारी, वणी: येथील बँक कॉलनी भागात रहिवासी आणि हल्ली नोएडा (दिल्ली) येथे आई वडीलांसह वास्तव्यास असलेल्या वैष्णवी विनोद कापसे हिने सीबीएसई 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून राज्याबाहेर वणी शहराचे नाव लौकिक केले आहे. वैष्णवी कापसे हिचे वडील डॉ. विनोद मन्सेराम कापसे हे एनआईईटी महाविद्यालयात निदेशक पदावर आहे. तर आईसुद्धा एनआईईटी मध्ये सहा. प्रोफेसर पदावर आहे. ग्रेटर नोएडा येथील डीपीएस वर्ल्ड स्कुलची विद्यार्थिनी वैष्णवी कापसे हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. मोबाईल व सोशल मिडियापासून दूर राहून वैष्णवी कापसे हिने दररोज 8 तास अभ्यास करुन यश मिळविल्याचे सांगितले. वैष्णवीच्या यशाबद्दल तिचे कुटुंबीय आणि बँक कॉलोनीवासीयांनी अभिनंदन केले आहे.

Lead StoryVaishnavi Kapse