विलास ताजने,(मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला येथील रहिवासी तसेच गावातील सर्वात जेष्ठ नागरिक विश्वनाथजी परागे यांचे आज दि.२३ जुलै सोमवारला सायंकाळी ७.१५ वाजता निधन झाले.
मृत्यूसमयी ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे-पतवंडे असा बराच आप्त परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर शिंदोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.