लो.टी. महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

शोभायात्रा व पथनाट्याने वेधले वणीकरांचे लक्ष

रोहण आदेवार, वणी: वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात आज दि. 23/02/2019 रोजी संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त महाविद्यायलात विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शहरात शोभायात्रा काढण्यात आली. ढोलच्या गजरात मार्गक्रमण करणा-या या शोभायात्रेने वणीकरांचे मन जिंकले.

पथनाट्य सादर करताना रासेवाचे विद्यार्थी

यावेळी विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबाच्या दशसुत्री वर आधारीत पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातुन वणीकर जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. किशन घोगरे यांनी शोभायात्रेचे आयोजन केले व प्रा. डॉ अरुंधती निनावे व प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय यांनी या शोभायात्रेला मार्गदर्शन केले.

Gadgebaba JayantiLead StoryLT collageNSS
Comments (0)
Add Comment