वैदेही नायगावकर यांचे निधन

उद्या मोक्षधाम येथे होतील अंत्यसंस्कार

जब्बार चीनी, वणी: येथील प्रतिष्ठित नागरिक व यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालक वैदेही राम नायगावकर (62) यांचे दीर्घ आजाराने आज दि. 23 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, एक मुलगी, सूना, नातवंडं असा मोठा आप्त परिवार आहे.

वैदेही नायगावकर या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सभासद होत्या. त्यांनी स्थानिक पातळीवर व जिल्हा पातळीवर भाजपाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. मागील पाच वर्षांपासून त्या यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालक होत्या.

त्यांच्यावर वणी येथील मोक्षधाम मध्ये दि. 24 जानेवारी रविवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

हेदेखील वाचा

मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

funeralLead Storynaygaonkarno moresundayvaidehi
Comments (0)
Add Comment