अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खरबडा परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील खरबडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीची आई शुक्रवार 22 जाने. रोजी दुपारी 11 वाजता आपल्या मोठी मुलीला घेऊन दवाखान्यात गेली होती. तिची लहान मुलगी घरात असताना घराशेजारी राहणाऱ्या हनुमान बालाजी राऊत (35 वर्ष) यांनी अल्पवयीन मुलीला बळजबरीने आपल्या घरात ओढत नेले व तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार पीडित मुलींनी दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत आईला सांगितले.

पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्द दुष्कर्मची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्द कलम 376(3), 504, 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4, 6 अंतर्गत गुन्हा दाखल केले. तसेच आरोपीला काही तासातच मारेगाव येथून अटक केली. पुढील तपास सपोनि माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

साप चावल्याने गणेशपूर (खडकी) येथील युवकाचा मृत्यू

KharbadaLead StoryMinor girl rape
Comments (0)
Add Comment