मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

दोन गाईवर वाघाचा हल्ला ,एक ठार तर एक जखमी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी गावांतर्गत चाटवन शिवारात वाघाचा मुक्त संचार आहे. वाघाने दोन गाईंवर हल्ला चढवून जखमी केले आहे. मांडवी गावांतर्गंत चाटवण शिवारात गजानन शंकर गोंड्रावार यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला केल्यामुळे बैल जखमी झालेला आहे.

बोरी येथील चिंतकुंटलावार यांच्या गाईला ठार मारून खाल्यानंतर सदर वाघाने गोंड्रावार यांच्या शेताकडे वळल्याची माहिती मिळाली आहे.

वाघाच्या दहशतीमुळे गावकरी घाबरले असून शेतमालक मजूर शेतात जाण्याकरिता भीत आहे. घटनेची माहिती वनविभाग कार्यालयाला देण्यात आली. घटनास्थळी दरोगा वाघाडे होते व त्यांच्यासोबत वनरक्षक सोनोने, पिकलिकवार , गोहोकार, किसन मेश्राम, कर्मचारी व मांडवी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

हेदेखील वाचा

‘परिसरात कुणालाही कोरोना लसीचे साईड इफेक्ट नाही’

lead story. mandvimuktsanchartigerWaghZari
Comments (0)
Add Comment