महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून दररोज विनाकारण भांडण व शिवीगाळ केल्या प्रकरणी तैलीफेल येथील महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार महिला ही आपल्या पतीसह तैलीफेल वणी येथे राहते. महिलेच्या घर शेजारी असलेला बंडू उर्फ यशवंत वसंत निमकर (52) हा नेहमी कोणत्याही कारणावरून तिच्या नवऱ्यासोबत भांडण करीत असतो.

शुक्रवार 22 जाने. रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान तक्रारदार महिला व तिचा पती जेवण करून घराबाहेर बसून होते. त्याचवेळी आरोपी दारू पिऊन तिथे आला. त्यांनी दोघांना अश्लील शिवीगाळ करून तुम्हा दोघा नवरा बायकोला एकाद्या दिवशी मारूनच टाकतो, अशी धमकी दिली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बंडू उर्फ यशवंत वसंत निमकर (52) रा. तैलीफेल वणी विरुद्ध कलम 294, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला.

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

हेदेखील वाचा

मोहुर्ली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

complaintLead StorylodgemahilashivigalWani
Comments (0)
Add Comment