कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह

शहरात 5 तर ग्रामीण भागात 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी:  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 11 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण हे शहरात तर 6 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील विठ्ठलवाडी येथे 2, जैन ले आउट, सहारा पार्क व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर मुर्धोनी येथे 3 व भालर टाऊनशीप, गणेशपूर व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

सोमवारी यवतमाळ येथून 41 रिपोर्ट आलेत. यातील 10 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 31 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 25 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 25 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 41 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 80 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1103 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 1000 रुग्ण कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 08 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 80 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 27 जण होम आयसोलेट आहेत. 30 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 23 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात 23 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा:

झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू

हे देखील वाचा:

जुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण

Corona Update 21 DecLead Story
Comments (0)
Add Comment