आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह

कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण जैन लेआऊट 1, लक्ष्मीनगर 1, आनंदनगर 1, विद्यानगरी 1, रामपुरा 1, भालर काॅलनी 1 आणि कोना 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे.

शनिवारी 121 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. तर पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट 03 जणांची झाली. शनिवारी 68 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 36 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 76 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 929 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 830 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. शनिवारी 5 व्यक्ती कोरोनामुक्त झाली. सध्या तालुक्यात 76 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 33 जण होम आयसोलेट आहेत. 22 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 21 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूंची संख्या 23 झाली आहे.

सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

उद्या गरजूंना होणार वणीत कपडेवाटप

हेदेखील वाचा

एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

COronaLead StoryPositivesatrudayseventalukaWani
Comments (0)
Add Comment