पारधी बेडा आणि कोलाम पोडावर आगळीवेगळी दिवाळी

बिरसा फाउंडोशन तर्फे साजरी करण्यात आाली दिवाळी

चेतन तोडसाम, मारेगाव: बिरसा फाउंडेशनतर्फे मारेगाव तालुक्यातील पारधी बेड्यावर आणि कोलाम पोडावर दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी वाद्याच्या तालावर नृत्याचा ठेका घेऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

बिरसा फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून आदिवासी भागात जाऊन तिथं दिवाळी साजरी करते. यावरषी पारधी बेडा ( गोंड बुरांडा), कोलाम पोड ( बिहाडी पोड), कोलाम पोड (नानाजी पोड) या मारेगाव तालुक्यातील आदिवासी पोडावर दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमात शंकरराव मडावी अध्यक्ष बिरसा फौंडेशन, रत्नमाला मडावी, डॉ. सचिन मडावी, डॉ. प्रियंका शेडमाके, तुषार आत्राम, पूनम आत्राम, पैकुजी आत्राम,चेतन तोडसाम, महेश शेंडे, संदीप मडावी, प्रतिक करमनकर आदी सदस्य उपस्थित होते.

Kolam PodMaregaonPardhi Pod
Comments (0)
Add Comment