भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषदेच्या पहापळ येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मस्की यांचे वडील उद्धव देवाजी मस्की यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी दि. 21 सप्टेंबरला निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. मारेगाव येथील रहिवासी असलेले उद्धव मस्की हे वनविभागामध्ये वनक्षेत्रपाल या पदावरून निवृत्त झाले होते. ते राळेगाव तालुक्यातील जवादे (किन्ही) तसेच मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा या वनपरिक्षेत्र विभागामध्ये कार्यरत होते. 1994 ला ते सेवेतून निवृत्त झाले होते. मनमिळाऊ स्वभावाचे असलेले उद्धव मस्की हे सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.