गद्दारांना जोडे मारा…!  वणीत रामदास कदम यांच्या पुतळ्याचे दहन

ठाकरे कुटुंबीयां विरोधात व्यक्तव्याचे वणीत तीव्र पडसाद
जितेंद्र कोठारी, वणी:  माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या अश्लील व गलिच्छ व्यक्तव्याचा निषेधार्थ वणी येथील शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आज बुधवारी सकाळी वणी येथील शिवाजी चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन केले.
शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी राजकीय व्यासपीठावर का दिसतात असा सवाल उपस्थित करत रश्मी ठाकरे यांना देखील लक्ष्य केले होते. रामदास कदम यांच्या टीकेनंतर शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. 
 शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, शहर अध्यक्ष सुधीर थेरे, युवासेना अध्यक्ष विक्रांत चचडा, गणपत लेडांगे, संजय आवारी, महेश चौधरी, राजू देवडे, प्रशांत बलकी, रिंकू पठाण व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
Lead Storyramdas kadam statementShivsena