मजरा येथे गावठी दारू अड्यावर पाटण पोलिसांची धाड

दहा लिटर दारू जप्त, एका आरोपीस अटक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मजरा येथे पाटण पोलिसांनी धाड टाकून 10 लिटर दारू जप्त केली व एका आरोपीस अटक केले.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, संदीप सोयाम, अंकुश पातोडे, हेमंत कामतवार हे आपल्या दुचाकीने घटनास्थळी पोहचेले असता गावाजवळील शेतात एक व्यक्ती हातभट्टी लावून दारू काढत असताना आढळून आला. पोलिसांनी अय्या कुमरे वय ३४ वर्ष याला अटक करून १० लिटर गावठी दारू ज्याची किंमत २ हजार रुपये जप्त केली. दारू काढण्याचे संपूर्ण वस्तू जागेवर नष्ट केले व गुन्हा दाखल करण्यात आला.

मजरा शिबला परिसर संपूर्ण जंगलाने वेढला असून याचा फायदा घेत या परिसरात गावठी दारू काढल्या जाते. पाटण पोलिसांच्या सतर्कतेमुळे लॉकडाऊनमध्ये शेकडो लिटर दारू जप्त करून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहे. ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या नेतृत्वाखाली वरील अधिकारी व कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.

PatanZari
Comments (0)
Add Comment