वणीत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा
कार्यकर्त्यांद्वारे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम
बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा बुधवारी दिनांक 19 जून रोजी वणीच्या काँग्रेसतर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. वणीतील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी विवेक मांडवकर, प्रमोद निकुरे, ओम ठाकूर, रुद्रा कुचनकर, खादम अनवर हयाती, भास्कर गोरे, सुरेश बनसोड, लक्ष्मण पोकनवार, मारोती व-हा़े, शेख अली, राजेंद्र खोब्रागडे, शाहिद खान, प्रशांत मंदे, सत्तार भाई यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.