वणी काँग्रेस कमिटी तर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

पुण्यतिथीनिमित्त राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम

जब्बार चीनी,वणी: वणी शहर सेवादल व तालुका काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम राबवून अभिवाद कऱण्यात आले. यावेळी शहरातील राजीव गांधी चौक येथील प्रतिमेला हारार्पण करण्यात आले व वणी ग्रामीण रुग्णालयात फळे, बिस्कीट, सेनीटायजर, मास्कचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला ऍड देवीदास काळे, प्रमोद वासेकर तालुका अध्यक्ष, प्रमोद निकुरे शहर अध्यक्ष, य.जि.म.बॅकेचे अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे, ओम ठाकूर, प्रमोद लोणारे, सुनील वरारकर, विवेक मांडवकर, संजय खाडे, प्रशांत गोहोकर ,सुरेश बनसोड, भय्याजी बदखल, रवि कोटावार, विकेश पानघाटे, सौ.संध्या बोबडे, वंदना आवारी, ज्योती सुर, गंगासिंह चव्हाण ,विनोद ठमके ,बबलू इत्यादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

कुख्यात शेंबड्या गजाआड, चोरीच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड

गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

CongressRajiv Gandhi
Comments (0)
Add Comment