शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहीम जोमात

आज गुरूनगर व ढुमेनगर परिसरात फवारणी

वणी बहुगुणी डेस्क: शिवसेनेतर्फे गेल्या 28 मार्चपासून शहर निर्जंतुकीकरणाचे कार्य सुरू आहे. आज वणीतील धुमेनगर व गुरुनगर परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख राजू तूराणकर यांच्या पुढाकारातून शहर फवारणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याआधी जैन ले आउट, प्रगती नगर, साने गुरूजी नगर वरोरा रोड इत्यादी परिसरात फवारणी करण्यात आली.

आज दिनांक 21 एप्रिल रोजी ढुमे नगर येथील खिवंसरा यांचे घर ते सचिन आत्राम, खारकर, खंडाळकर, ते भास्कर मोहूर्ले गुरुनगर यांचे घरजवलील परिसर तसेच माजी आमदार वामनराव कासावार यांचे घरापासून विराज चिकनकर, शालिनीताई रासेकर, सुधीर थेरे, मोहन हेपट यांच्या घराजवळील परिसरात फवारणी करण्यात आली.

शहर प्रमुख राजू तुराणकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या निर्जंतुकीकरण मोहिमेत माजी युवा सेना शहर संघटक महेश पहापळे, युवासेना वणी तालुका चिटणीस अजिंक्य शेंडे, मिलिंद बावने, शाखा प्रमुख निखिल तुराणकर, साने गुरुजी नगर शाखा प्रमुख जनार्दन थेटे, जैन ले आउट शाखा प्रमूख सचिन ठावरी ईत्यादी परिश्रम घेत आहेत.

Lead StoryShivsena
Comments (0)
Add Comment