‘जनता कर्फ्यू’ला साथ द्या: आ. बोदकुरवार

5 वाजता टाळ्या वाजवून समर्थन करण्याचेही आवाहन
बहुगुणी डेस्क, वणी: देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी दि. 22 मार्चला पूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू स्वयंप्रेरणेने संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेनी मनापासून समर्थन द्या असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
सर्वांनी कोरोना विषाणू पासून स्वतःला व या समाजाला वाचविण्याचा दृढसंकल्प करा. तसेच या कठीण प्रसंगी या विषाणूंचा मुकाबला करणाऱ्या आरोग्य, पोलीस इ इतर विभागाला प्रेरणा देण्यासाठी बरोबर 5 वाजता टाळ्या वाजवून समर्थन करा असे ही आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जनतेला रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू केलाये. तसेच टाळ्या, थाळी आणि घंटी वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्याचेही आवाहन केले आहे. या पाश्वभूमीवर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रसिद्धी पत्रक काढून सदर आवाहन केले आहे.
COronaLead StoryMLA Snajeevreddi Bodkurwar
Comments (0)
Add Comment