चिलई जिल्हा परिषद शाळेत काव्योत्सव

कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगण्यातली सकारात्मकता
सुनील बोर्डे, वणी: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिलई येथे काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ख्यातनाम कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 10 ते 12 जि. प. शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धगडी, उपाध्यक्ष गजानन दरेकार, पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये कवितेची गोडी वाढविण्यासाठी सुनील इंदुवामन ठाकरे हे दोन तपांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांशी ‘‘जगू कविता: बघू कविता’’ या कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. चिलई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी नारायण सुर्वे, ग्रेस, सुरेश भट, साने गुरूजी अशा अनेक कवींच्या कवितांमधून विद्यार्थ्यांना जगण्यातली सकारात्मकता दिली. कवितांमधील अनेक सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील वाटेकर यांनी तर आभार प्रदर्शन व नियोजन संजय नागभिडकर व महादेव खंडाळे यांनी केले.
ChilaiJagu kavita baghu kavitaSunil Induwaman ThakreZp School Chilai
Comments (0)
Add Comment