महिला काँग्रेस तर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

जयंतीनिमित्त प्रतिमेला हारार्पण करुन ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची 105 वी जयंती वणी शहर महिला काँग्रेस तर्फे शनिवार 19 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. महिला काँग्रेस वणी शहर अध्यक्ष सविता ठेपाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अभिवादन कार्यक्रमात स्व. इंदिरा गांधी यांच्या फोटोवर हार अर्पण करुन इंदिरा गांधी अमर रहे अशी घोषणा देण्यात आली. त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुकाध्यक्ष संध्या बोबडे, माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, वंदना धगडी, मंगला झिलपे, विजया आगबत्तलवार, मंदा बांगडे, प्रमिला चौधरी, सुरेखा वडीचार, उज्ज्वला दोडके, ललिता बरशेट्टीवार व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

indira gandhi jayantiLead Story