आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

नागरिकांना दक्ष राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांतील वणीतील आंबेडकर चौकातील 3, रविनगरातील 1 तर 1 जण राजूर कॉलरी इथला आहे. नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे.

शुक्रवारी 94 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. तर पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट 05 जणांची झाली. शुक्रवारी आलेल्या रुग्णांवरून 29 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 65 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 74 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 922 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 825 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. शुक्रवारी 1 व्यक्ती कोरोनामुक्त झाली. सध्या तालुक्यात 74 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 36 जण होम आयसोलेट आहेत. 19 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 19 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 23 झाली आहे.

शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू… गुरुवारी 22 पॉजिटिव्ह

 

COronaCovid 19fridayLead StorytalukaupdatesWani
Comments (0)
Add Comment