जितेंद्र कोठारी, वणी: शेजारील विवाहित महिलेचा पती गावाबाहेर जाऊन असल्याची संधी साधून एका तरुणाने एका महिलेवर बळजबरी अत्याचार केला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी झरी तालुक्यातील अर्धवन गावात उघडकीस आली. पीडित महिलेने दि. 19 ऑक्टो. रोजी मुकुटबन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून मुकुटबन पोलीस ठाण्यात आरोपी सतीश दत्तू म्याकलवार (35) विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
तक्रारीनुसार पीडित महिलेचा पती चालक आहे. दि. 14 ऑक्टो. रोजी प्रवासी घेऊन तो केळापूर येथे गेला होता. त्यामुळे घरात विवाहित महिला व तिचे सासू सासरे होते. रात्री 11 वाजता दरम्यान शेजारील घरातील सतीश म्याकलवार हा गच्चीवरील भिंत ओलांडून पीडितेच्या घरात घुसला. सासू सासरे झोपून असल्याची खात्री करून सतीशने महिलेचा तोंड दाबून तिला बाथरूममध्ये ओढत नेले व तिच्यावर बळजबरीने दुष्कर्म केले. पीडिताने ओरडण्याचे प्रयत्न केले असता आरोपी यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर याबाबत महिलेने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. अत्याचार पीडितेच्या तक्रारी वरून पोलिसांनी मंगळवार 19 ऑक्टो. रोजी रात्री आरोपी सतीश दत्तू म्याकलवार रा. अर्धवन याच्या विरुद्ध कलम 376, 354 (ड) (1), 506 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, पोलीस निरीक्षक अजित जाधव, विजय वानखेडे व संतोष कायवेलवार करीत आहे.