युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

गोंडबुरांडा येथील घटना

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका 26 वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दि. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहिती नुसार राजु उर्फ प्रशांत विठ्ठल पावडे (26) रा. गोंडबुरांडा हा गावातील शाळेजवळील विहिरीवर बसून होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यातच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची फिर्याद पोलिसात मृतकाच्या वडिलानी दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास जमादार लक्ष्मण गोळेकर करित आहे.

Gond BurandaLead Story
Comments (0)
Add Comment