शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येसापूर येथील कुट्टरमारे नामक शेतकऱ्याच्या शेतात काम करणारा मजूर पांडुरंग तुकाराम आत्राम वय ३५ वर्ष त्याने १७ ऑक्टोबरला शेतमालकाच्या शेतात जाऊन विष प्राशन केले.

घटनेची माहिती मिळताच शेतमालक व गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पांडुरंग याला घेऊन वणी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकुर्ती जास्त गंभीर झाल्याने चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी पांडुरंग यांचा मृत्यू झाला. विष प्राशन करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Lead StoryYesapurZari
Comments (0)
Add Comment