Breaking News: चिंतामणीच्या चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात

1 ठार तर 7 जण गंभीर, पळसोनी फाट्याजवळील घटना

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी फाट्यावर चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही ट्रॅव्हल्स असून संध्याकाळी सहाच्या सुमारास ही टॅव्हल्स उलटली.

टॅव्हल्सने पळसोनी फाट्याजवळ एका दुचाकी स्वाराला उडवले. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याखाली जाऊन उलटली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर ट्रॅव्हल्समधले 7-10 प्रवासी गंभीर जखमी आहे. ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव भारत वैद्य असून झरपट येथील रहिवाशी आहे. तो मजुरी करतो.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. जखमींना वणीतील ग्रामीण रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

Lead Story
Comments (0)
Add Comment