गावाने लावला जोर अन् पळून गेलेत चोर

गावकऱ्यांनीच हाणून पाडला चोरट्यांचा डाव

संजय लेडांगे, मुकुटबन: गाव करी ते राव न करी म्हणातात. गावाने एकजूट करून चोरीचा मोठा डाव उधळून लावला. हिरापूर (मांगली) आणि भेंडाळा गावात गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. मांगली (हिरापूर) परिसरात चोरटे चांगलाच धुमाकूळ माजवीत सक्रिय झाले आहेत. परिसरात चोरट्यांची भीती कायम आहेत. तरीदेखील गावकरी एकजुटीने या संकटाचा सामना करीत आहेत.

मुकूटबन येथील बाजारपेठेत असलेल्या किराणा दुकान, हॉटेल आणि पानसेंटर फोडून चोरट्यांनी मोठा डल्ला मारत. आता परिसरातील गावातही सक्रिय झाले आहेत. १७ सप्टेंबरच्या रात्री भेंडाळा गावातील दोन घरांची दारे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी हिरापूर गावातही या चोरट्याने घराची खिडकी फोडून प्रवेश केला.

घरात आवाज आल्याने घरची मंडळी जागी झालीत.परिणामी चोरीचा डाव फसला. परंतु काही तासांनी पुन्हा गावात चोरीच्या बेतात असताना, गावकऱ्यांच्या सतर्कतेने चोरटे पसार झालेत. सध्या परिसरात चोरट्यांची भीती वाढली आहे. परिसरात चोरटे सक्रिय झाल्याने भीतीचे वातावरण कायम आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

HirapurLead StoryMangliplanedThiefvillagers
Comments (0)
Add Comment