धोपटाळा येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेलेला तरुण घरी परत आलाच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील धोपटाळा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदानंद विठ्ठल दोरखंडे (वय अंदाजे 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो शेती करायचा. शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री सदानंद हा जनावरांना चारा देण्यासाठी शेतात गेला होता. मात्र तो शेतातून घरी परत आलाच नाही. त्यामुळे सकाळी त्याचे वडील सदानंदचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. मात्र त्यांना शेतात असलेल्या एका झाडाला नॉयलनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सदानंद आढळून आला. सदानंदच्या वडिलांनी याची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. सदानंदने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा

DhoptalaFarmer suicideLead Story