अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

मारेगाव तालुक्यातील सराटी येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सराटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आज पहाटे पासून बेपत्ता झाली. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवुन नेल्याचा संशय मुलीच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी (17) ही नेहमीप्रमाणे पहाटे घरकामासाठी उठली होती. 4 वाजताच्या सुमारास तिला भांडी घासताना तिच्या आईने बघितले होते. मात्र काही वेळाने तिच्या आईला मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. 

मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा आजूबाजूला शोध घेतला असता मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

विष प्राषण केलेल्या कोलगाव येथील शेतक-याचा अखेर मृत्यू

Lead StoryMinor girlSarati
Comments (0)
Add Comment