जितेंद्र कोठारी, वणी: फॅक्टरीला सुट्टी असल्याने वणीत दुचाकीने ट्रीपल सीट आलेल्या मजुरांचा परत जाताना मोहुर्लीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मजूर जागीच ठार झाले तर एक जखमी आहे. अपघात झालेले तीनही मजूर हे मोहुर्लीजवळील एका फॅक्टरीत काम करायचे. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
रतिकांत अनंतराव राऊत (28) मुळ रहिवासी राज्य ओडीशा, चंदन कुमार (25) मुळ रहिवासी बिहार, सुजन मोडिकोरा (28) मुळ रहिवासी प. बंगाल हे तिघेरी गेल्या काही काळापासून मोहुर्ली येथील एका फॅक्टरीत कामगार म्हणून काम करतात. कंपनीच्या आवारातच ते राहतात. एकत्र काम करत असल्याने या तिघांची मैत्री होती. बुधवारी दिनांक 19 एप्रिल रोजी फॅक्टरीला सुटी असल्याने रात्री 9 वाजताच्या सुमारास हे तिघे स्प्लेंडर (MH40 AW0179) या दुचाकीने जत्रा रोड परिसरात गेले. तिथून ते एका बार मध्ये गेले. तिथे त्या तिघांनी मद्यप्राशन केले.
मद्यपान केल्यानंतर ते फॅक्टरीमध्ये दुचाकीने ट्रीपल सीट परत जात होते. दरम्यान रासा फाट्यावरील एका बारमध्ये ते पुन्हा बसले. तिथेही मद्यप्राशन केल्यानंतर हे तिघेही परत निघाले. मात्र मोहुर्ली गावाजवळ त्यांची भरधाव दुचाकी एका खड्यात गेली. त्यामुळे चालक चंदन याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी स्लीप झाली व घासत रस्त्याबाहेर गेली, तर गाडीवरील तिघेही दूर फेकले गेले.
या अपघातात दुचाकी चालक चंदन व मागे बसलेला सृजन याला गंभीर दुखापत झाली. तर तिसरा प्रवासी रतिकांत हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरील लोकांनी ऍम्बुलन्स बोलावली व जखमींना वणीतील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी चंदन व सृजन याला मृत घोषीत केले. तर रतिकांतवर उपचार सुरू आहे. प्रकरणाची वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
हे देखील वाचा: