सावधान…! मास्क न लावणे पडू शकते महागात

आज वणीत 13 जणांवर पोलिसांची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या सरकारच्या लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 13 जणांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दुपारी टिळक चौकात ही कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांचा समावेश अधिक आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील एक जण नागपूरहून वणीत आला होता.

रुपेश पांडुरंग लेडांगे (27) रा. मजरा, संतोष दिलीप डहाके (28) रा. येणक, नूर मोहमद इदायत उल्ला (25) राजूर कॉलरी, आकाश महादेव पंधरे (29) बोधाड, अजित पुंडलिक मोहितकर (27) कानडा, शुभंकर जगदीश ठाकूर (52) सेवानगर वणी, विजय अशोक ढबकाळ (52) सेवानगर वणी, संतोष मुलींगा शाहू (40) राजूर, उमेश उद्धव कचकरे (40) भालर, लजाज खान अमीर खान पठाण (40) रा. वणी, यांच्यासह सुनील श्रीधर वणड्रस्कर रा. अंतरगाव ता. कोरपना यांच्यावर कारवाई करण्यात आली आह.

वंड्रसकर हे ऑटो चालक असून ते तोंडाला मास्क न लावता ऑटो चालवत असताना दिसून आले. या व्यतिरिक्त सकीब खान मुश्ताक खान रा. जैन ले आऊट वणी हे कारचालक असून यांनीसुद्धा तोंडाला मास्क लावला नव्हता. तर युवराज शिवाजी धांदे (42) रा. मंगलम पार्क वणी हे नागपूर येथून कोणतेही पूर्वसूचना न देता वणीत दाखल झाले होते.

या सर्वांवर जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे या सर्वांवर कलम 188, 269 नुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाई डीबी प्रमुख गोपाळ जाधव यांनी केली.

COronaLead StoryMask
Comments (0)
Add Comment