गरीब-गरजू वृद्धांना आधारकाठी आणि पादत्राणाचे वाटप

गिरीष कुबडे, वणी: नगर सुधार समितीच्या वतीने वणी शहरातील गरीब-गरजू वृद्धांना आधारकाठी आणि पादत्राणे वाटपाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. १५ मार्च पासून प्रत्यक्ष गरजूंच्या घरोघरी जावून हे कार्य सुरू आहे. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागत असल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नगर सेवा समितीने काही दानशूरांच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. वृद्धांना आधार देण्याचा एक प्रयत्न आहे. शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन दान करण्याचा निर्णय घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येते आहे.

या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, सचिव दिलीप कोरपेनवार, अनिल गुप्ता, राजू तुरानकार, रमेश बोबडे, दत्तरामजी खाडे, संजय पिदूरकर, कृष्णराव ठवकर,अरुण वाघमारे इत्यादी सदस्य या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे.

Lead StoryNagar seva samiti
Comments (0)
Add Comment