अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतहेह

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे आज सकाळी (बुधवारी) एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हायवेवर विनायक कोटेक्ट जिनिंगच्या गेटच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला. थंडीमुळे या वृद्धेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळी काही फिरायला गेलेल्या लोकांना सदर महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. हा मृत्यू थंडीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. सध्या तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकणार.

गेल्या तीन चार दिवसांपासून पारा घसरला आहे. त्यामुळे परिसरात थंडीचा तडाखा वाढला आहे. थंडीमुळे रात्री लवकरच रस्ते ओस पडत आहेत. या थंडीचा मोठा फटका निराधार आणि बेघर लोकांना पडला आहे. त्यांना हव्या त्या साधनांमध्येच थंडीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी लोक कचरा किंवा रत्यावरच्या मोळ्या पेटवून थंडीपासून रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अपु-या पांघरुणामुळे त्यांनाही रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागत आहे.

Lead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment