पोलिसांवरील हल्ल्याची दिली आरोपीने कबुली

विलास ताजने, वणी : मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे पोलिसांवर आपणच हल्ला केल्याची कबुली आरोपी अनिल मेश्रामने मारेगाव पोलिसांना दिली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान मंगळवारी आरोपीची सदर घटनेबाबत चौकशी करण्यात आली.

घटनेच्या दिवशी पोलीस वारंट घेऊन रात्री माझ्या घरी आले. मला पोलीस ठाण्यात सोबत येण्यास आग्रह करीत होते. मी उद्याला येतो म्हणून सांगत होतो. पण पोलीस आताच चाल म्हणत होते. म्हणून माझे डोके भडकले. मी पोलिसांना काठीने मारहाण करण्यात सुरुवात केली. तेंव्हा एक पोलीस खाली पडला. त्याला मी हातातील काठीने झोडपले. दोन पोलीस पळून गेले.

खाली पडलेला पोलीस मेल्याचे दिसताच मी पळून गेलो. जाताना मी आगडब्बी आणि मेलेल्या पोलिसाचा मोबाईल सोबत घेऊन गेलो. जंगलात राहतांना खूप थंडी होती. माझ्याकडे पांघरूण नव्हते म्हणून यावेळी मी घरी आलो. अशी कबुली कोठडीतील आरोपीने पोलिसांना दिली.

चौकशी दरम्यान पोलिसांनी मृतक राजेंद्र कुळमेथे यांचा मोबाईल आरोपीच्या भावाकडून जप्त केला. तसेच आरोपीने गावालगतच्या विहिरीजवळ लपवून ठेवलेले कपडे जप्त केले.

Lead StoryMaregaon Police
Comments (0)
Add Comment