आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

सुंदरनगरमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले सर्व रुग्ण हे रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी सुंदर नगर येथे 4 रुग्ण, तेजापूर येथे 1 तर वणीतील रामपुरा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण 710 रुग्ण झालेत.

आज यवतमाळहून एकही अहवाल प्राप्त झाले नाही. तर आज 23 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 17 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 11 जणांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर अद्याप 80 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 39 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 710 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 670 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 3 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 39 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

सध्या 18 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 18 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 7 व्यक्तींवर उपचार सुरू आहे.

COronaLead Story
Comments (0)
Add Comment