‘सर आली धावून… पूल गेला वाहून’

विद्यार्थ्यांसह मारेगाव कोरंबी ग्रामवासियांची फजिती

बहुगुणी डेस्क, वणी: नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यात अनेकांची गैरसोय केली. मारेगाव (कोरंबी) येथेदेखील अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसात तिथला पूल वाहून गेला. ‘सर आली धावूल, पूल गेला वाहून’चा प्रत्यय मारेगाववासियांनी अनुभवला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामवासियांची प्रचंड फजिती होत आहे.

मारेगाव ( कोरंबी) येथे गावातून शाळेकडे जाणारा एकमेव पूल आहे. रस्त्यावरील पूल परवा अति पावसामुळे वाहून गेला. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अशी कसरत करीत शाळा गाठावी लागते. सोबत या रस्त्यावर गावातील घाण सांडपाणी वाहते. हे घाण पाणी ओलांडून मुलांना शाळेत यावे लागते. या दोन्ही बाबीची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

Lead Storymaregaon. KorambimenacerainSchoolStudents
Comments (0)
Add Comment