एका महिन्यातच रस्त्याची ‘वाट’ लागली

आय. एस. ओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

विवेक पिदुरकार, चिखलगांव: येथील सदाशिवनगरात रस्त्याच्या मधोमध नालीवरती काही दिवसांपूर्वी रपट्याचे झाले.अतीशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेला रपटा एक महिना होण्याआधीच फुटला. एका महिन्यातच या रस्त्याची ‘वाट’ लागली. त्यामुळे आय. एस. ओ नामांकन प्राप्त चिखलगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा ‘रस्त्यावर’ आला.

या रस्तावरुन सारखी वर्दळ सुरु असते. कारण येथून केवळ काही अंतरावरच एक मोठे हॉस्पीटल आहे. या फुटलेल्या रपट्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीचा यात जीवसुध्दा जाऊ शकतो. याला जवाबदार कोण राहतील अशी येथील ग्रामस्थांची ओरड आहे.

या नालीवरील हा तुटलेला रपटा हा इथल्या नागरिकांसाठी धोक्याचे निमंत्रण देत आहे. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, ही नागरिकाची अपेक्षा आहे. त्यामुळे हा रपटा त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी युवक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर, उपाध्यक्ष प्रदीप खेकारे यांनी प्रसिध्दीपत्रका मार्फत केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

ChikhalgaoncollapsedLead Storymonthnewraptasadashivnagarwithin
Comments (0)
Add Comment