कमळवेल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

प्राथमिक आरोग्यकेंद्रात केले शाखेने वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तालुक्यातील कमळवेल्ली शाखेने उत्साहात साजरा केला. भाजपाच्या स्थानिक शाखेने हे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण केले. मोदींनी देशात विकासाचे रोप लावले. त्याचंच प्रतीक म्हणून वृक्षारोपण करीत असल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा झाला. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यावर चर्चा झाली. प्रदूषणाने होत असलेली हानी घातक ठरत आहे. कोळश्यांच्या खाणींचा हा परिसर आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील स्वयंप्रेरणेने अधिकधिक झाडे लावावीत ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

वृक्षारोपणाला भारतीय जनता पक्षाचे कमळवेल्ली शाखाप्रमुख प्रवीण चुक्कलवार, युवा कार्यकर्ते विनोद गिज्जेवार, धनराज सिडाम, गणेश नुगुरवार, सुमित अग्रवाल, रोहित डेगरवार, हर्षवर्धन सिडाम, अतुल चांदेकर आणि मित्र परिवार उपस्थित होता.

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

kamalvelleLead StorymodinarendraOfprimeminister
Comments (0)
Add Comment