वाघाच्या हल्यात शेतात काम करणारी महिला ठार

परसरात वाघाची दहशत

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. लक्ष्मी दडांजे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे . ही महिला शेतात निंदण करीत असताना वाघाने तिच्यावर हल्ला केला. या तिचा जागेवरच मृत्यू झाला.

अंधारवाडी, वारा कवठा या भागात अनेकवेळी वाघाचा वावर आहे. अनेकांना या भागात वाघाचे दर्शन झाले आहे. या पूर्वीही या भागात वाघाने मनुष्यावर हल्ले केले आहे. पण सुदैवाने ते वाचले. वाघाने या परिसरात अनेक गायी, म्हशींवर हल्ले करून ठार मारल्याची घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

या वाघाला पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसातील शेतकरी करीत आहेत. राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. ते या वाघाला पकडण्यासाठी काय कार्यावाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Lead StoryPandharkawda
Comments (0)
Add Comment