बेड्यावरील गावठी दारू अड्ड्यावर धाड

मारेगाव पोलिसांची कारवाई, चार आरोपींना अटक

नागेश रायपुरे, मारेगाव: गोंडबुरांडा येथे मोहफुलाची दारू काढणा-या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच बॅरल मोहाची दारू जप्त केली आहे. बुधवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान मारेगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

गोंडबुरांडा येथील बेड्यावर गावठी दारू काढत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जगदीश मंडलवार यांना मिळाली. त्या माहितीवरून त्यांनी सापळा रचला. रात्री 9 वाजता दरम्यान त्यांनी बेड्यावर धा़ड टाकली असता तिथे त्यांना गावठी दारू आढळून आली. या प्रकरणी सत्याग्रह पवार (40), अनिल पवार (40), दादा पवार (42) सतीश पवार (26) या चौघा संश यीतांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी 5 बॅरल दारूसह एकूण 12 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई मारेगावचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विजय चलाख, सहाय्यक फौजदार राहुल ओइबे, शशिकांत वानखेडे, विजय कुडमेथे, राजू टेकाम, भगवान चिडे यांनी पार पा़डली.

Deshi LiquorGondburandaLead StoryLiquor
Comments (0)
Add Comment