घोड दौड स्पर्धेत डॉ. संकेत अलोणे यांना रौप्यपदक

मुंबई येथे झाली होती घोडदौड स्पर्धा

जितेंद्र कोठारी, वणी: इंडिजिनियस अश्व प्रेमी संघ मुंबईच्या वतीने सफाळा बीच मुंबई येथे घेण्यात आलेल्या घोडदौड स्पर्धेत वणीतील डॉ. संकेत दिलीप अलोणे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करीत रौप्यपदक मिळवले. 20 किलोमीटरचे अंतराची ही स्पर्धा होती. या स्पर्धेत 70 अश्वप्रेमींनी सहभाग घेतला होता. ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात ‘अल – उबेद’ या घोड्यावर त्यांनी ही दौड मारली. डॉ. संकेत अलोणे हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात असून ते अश्वप्रेमी म्हणून सुपरिचित आहेत. ते पहिल्यांदाच अशा स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे विदर्भातून ते एकमेव स्पर्धक होते. संघाचे अध्यक्ष अजय नेमसे व सचिव खुषरू पटेल यांच्या हस्ते डॉ. संकेत यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या या यशा सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Horse RidingLead stprySanket Alone