जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जैताई मंदीर जवळील रहीवासी असलेल्या परमेश्वरी जगमोहनजी पोद्दार यांचे आज दिनांक 19 जानेवारी बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी 4.30 वाजता जैताई मंदीर जवळील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश जगमोहनजी पोद्दार, देवानंद (मुन्ना) जगमोहनजी पोद्दार, योगेश जगमोहनजी पोद्दार, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.