शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

शेतातून परतत असताना वाहनाची महिलेला जबर धडक

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान शिरपूर व मेंढोली फाट्यादरम्यान अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. यात ती महिला जागीच ठार झाली.

सविस्तर वृत्त असे की शोभा योगेश गाउत्रे (50) ही शिरपूर येथील रहिवाशी होती. शिरपूर येथे त्यांचे शेत आहे. आज शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी शोभा या सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्या शेतातून परतत होत्या. शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान महिलेला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जबर होती यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

द अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. महिलेचे शव पीएमकरिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आले आहे. मृतक शोभा याच्या मागे पती, 2 मुले, सूना व नातवंड आहेत. शोभा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे पण वाचा:

शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली

हे पण वाचा:

बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

Lead StoryMendholishirpur
Comments (0)
Add Comment