शिंदोला येथील लक्ष्मण झाडे यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली:  वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकरी लक्ष्मण रामाजी झाडे यांचे दि.(१७) शनिवार दुपारी सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

उपचारासाठी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने सावंगी येथे हलविण्यात आले होते. रविवारी शिंदोला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी कमला, मुलगा संतोष, सून, चार मुली, जावई असा परिवार आहे.

Lead Storynidhan varta
Comments (0)
Add Comment