दुचाकीच्या धडकेत युवक ठार

मुकुटबन - खडकी मार्गावर भीषण अपघात

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 2 किमी अंतरावर असलेल्या कासावार यांच्या इसार पेट्रोल पंपाजवळ शनिवारी 17 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अपघात झाला. दुचाकीने दुचाकीला धडक मारल्याने अडेगाव येथील युवकाचा मृत्यू झाला.

माहितीनुसार अडेगाव येथील प्रशांत मारोती ढेंगळे (28) हा आपल्या मित्रासोबत मुकुटबनला कामानिमित्त आला होता. काम संपवून घरी जाण्यास निघाला. पंपवर पट्रोल भरून गावाकडे वळण घेताना मुकुटबन कडूनच येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ढेंगळे याच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

धडकेत मारोती ढेंगळे हा गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्राला किरकोळ मार लागला. धडक मारणाऱ्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून असल्याची माहिती मिळत आहे. तर ती दुचाकी यामाहा एक्स झेड कंपनीची असल्याची माहिती प्रत्यदर्शी सांगत आहेत. अपघात होताच प्रशांत याला मदत म्हणून एका ऑटोचालकाने आपला ऑटो थांबवून त्याला मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात आणले. त्यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे कळविले.

प्रशांत यांची तब्येत सिरीयस असल्याने त्याला वणीला रेफर केले. आरिसीपीएल कंपनीतील रुग्णवाहिका बोलावून त्याला वणीला हलविले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यू वणीत झाल्याने वणी पोलिसांनी नोंद केली आहे. विशेष म्हणजे या अपघाताची माहिती मुकुटबन ग्रामवासी व पोलिसांनासुद्धा माहीत नाही. लोकांनीच अपघातग्रस्तांना त्वरित हलीविल्याने अपघाताची चर्चा नाही.

धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेणे मुकूबन पोलिसांसमोर आवाहन आहे. कासावार यांच्या पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉडिंग झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

deathLead Storynear mukutbanTwowheeler
Comments (0)
Add Comment